Facebook Patriots | Ek Vadal Bharatach

फेसबुक्या राष्ट्रभक्त

माझा एक मित्र आहे, विनोद. सोशल मीडियाच्या जगात इतका अडकून असतो की बाहेरचा पत्ताच राहत नाही. Facebook वर कोणत्या देशाच्या झेंड्याला जास्त लाईक आहेत, यावरून कोणता देश श्रेष्ठ, हे ठरवतो. स्वतः कुत्र्यालाही घाबरतो पण फेसबुक वर expel the dragon (चीन) अश्या नामक पोस्ट करतो, ब्रेक अप नंतर प्रेयसी ने कुर्त्याचा जरी फोटो टाकला तरी तो त्याच्या साठीच आहे की काय असे त्याला वाटायला लागते, असा हा माणूस मात्र येता जाता रस्त्यावरती कचरा करतो, वृध्द गृहस्थ, दिव्यांग यांना हाडतुड करतो , समजातील दुर्बल घटकांविषयी दया भाव तर सोडाच, पण माणूस म्हणून सुद्धा त्यांना बघत नाही, समाजात कार्य करणाऱ्या समाजसेवकांना ट्रॉल आणि स्क्रोल करतो. स्त्रियांवर शारीरिक कमेंट्स करून आया बहिणी वरून शिव्या देतो , स्वतःच्या आई आणि वडिलांना घराबाहेर काढून Fathers Day ला लाईक्ससाठी जेव्हा त्यांचाच फोटो फेसबूक वर असतो , तेव्हा या ऑनलाईन जगाचा फोलपणा आपल्या समोर येतो.

आता विनोद हे पात्र जरीही काल्पनिक असेल, तरी देखील ही मानसिकता आपल्या आजूबाजूला नक्कीच आढळत असते , कदाचित या मानसिकतेचे काही गुण आपल्यात ही असतील, या सर्व गुणांचे अस्तित्व आपल्याला आभासी सुख देत असते, ज्यामधून आपण गर्वाचा पिटारा बडवत असतो , पण असे म्हणतात ना गर्वाचे घर खाली, अशीच काही ही या गुणांची अवस्था असते.

या ऑनलाइन देशभक्तीचे आभासी जग समजून घ्यायचे असेल तर ,पुढील वाक्यांची कल्पना करा.

गौतम बुद्धांनी त्यांच्या फेसबुक वर फाइंडिंग पिस विथ 24 other’s अशी पोस्ट टाकली, त्यास वर्धमान महावीरांनी लाईक आणि कमेंट केली. आणि ऑनलाईन संघ सुरू झाला. त्याच प्रमाणे भगत सिंग त्यांच्या व्हॉटस् अप ग्रुप वर इंकलाब झिंदाबाद !असा मेसेज पुढील १५ जणांना पाठवल्यास भारताला स्वातंत्र्य मिळेल. असा मेसेज करतात आणि तो इतर ऑनलाईन क्रांतिकारी फॉरवर्ड ही करतात.

वरील ओळींचा जर विचार केला तर आपल्या समोर एक हास्यात्मक प्रश्न पडतो, की बाबा काय म्हणतो आहे नक्की लेखक , असे ऑनलाईन लिहून कुठे काय होत असते का? आणि तेव्हा कुठे होत हे फेसबुक आणि कसल काय ते व्हॉटसअप…

हेच , म्हणायचे आहे मला. आजच्या 2 दिवसाच्या(15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी) ऑनलाईन देशभक्तांना हेच सांगायचे आहे की , आज आपण 26 जानेवारी ला तिरांग्या बरोबर DP ठेवणार , देशभक्तीचे स्टेटस ठेवणार आणि या स्टेटस वरून स्वतःच्या देशभक्ती वर गर्व करणारं. संपल!!!!!

हीच असते का देशभक्ती ? याने खरचं देशासाठी काही अनुकूल घडणार आहे का? याचा आपण विचार करायला हवा.

कारण भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांनी क्रांतिकारी कृत्या करून त्यांची देशभक्ती सिद्ध केली होती , स्वातंत्र्य सेनानी अशे ऑनलाईन देशभक्ती करत असते, तर कदाचित भारताला ही केवळ फेसबुक वरतीच स्वातंत्र्य मिळाले असते.

त्यामुळे या सर्व ऑनलाईन देशभक्तांनी स्वतःच्या कृतीचे स्वतः परीक्षण करावे. कृती करण्याचा फक्त विचार करून चालणार नाही, तर “एक वादळ भारताच” या मोहिमे प्रमाणे देशाच्या सर्वांगीण विकासाच्या सामाजिक , सांस्कृतिक , पर्यावरणीय , अश्या कोणत्याही क्षेत्रात किमान योगदान देण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे आता विचार करत बसू नका, कृती करा.

प्रसिद्ध शायर जलील आली म्हणतात त्याप्रमाणे

“रास्ता सोचते रहने से किधर बनता है ,
सर में सौदा हो तो दीवार में दर बनता है ”

यानुसार अन्नदान , शिक्षण सहाय्य, आरोग्य शिबिर, सामूहिक कार्यक्रम , बंधुता शिबिर, स्वच्छता मोहीम , यांसारख्या अनेक मार्गामधून आपण आपले देशा बाबतचे प्रेम नक्कीच दाखवू शकतो ,

तरीही देखील आपण काही करत मात्र नाही ,असे का? कारण आपल्याला भीती असते की लोक काय म्हणतील, लोक आपल्या वरती हसतील का? आपल्याला कोणी समर्थन करेल का? आपल्या कार्यामुळे आपले व घरच्यांचे नुकसान तर नाही ना होणारे , या ना-ना प्रकारच्या भीती आपल्याला व्यक्त होण्यापासून रोखतात आणि आपलं आयुष्य पुन्हा फेसबुकच्या पिंजऱ्यात अडकून जाते, आणि सरतशेवटी पिंजऱ्यातल्या या पक्ष्यांना मुक्त उडणे हा आजार वाटायला लागतो.

या भीती काही वास्तविक ही असतील , कदाचित कोणीही तुम्हाला समर्थन करणार नाही ,कदाचित तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल, कदाचित लोक तुमच्या वरती हसतील सुद्धा पण जर तुमच्या समोर तुमचे ध्येय आणि देश प्रेम स्पष्ट असेल तर तुम्ही या सर्वांच्या पुढे जाऊन तुमचे कार्य यशस्वी रित्या करू शकता.

सरते शेवटी फेसबुक च्या अभासातून बाहेर येऊन वास्तविक देशभक्ती करायचा विचार करणाऱ्या देशभक्तांना बिस्मिल अजिमाबादी यांच्या 2 ओळी नक्कीच समर्पक ठरतील.

“सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है “

लेखक – सत्यम टाकसाळे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Want to be a Leadership Ambassador