एक वादळ भारताच: युवा नेतृत्त्व अभियान – २०२५

Let’s Create History Together

जागर अधिकार आणि कर्तव्यांचा, जागर संविधानाचा...! जागर अधिकार आणि कर्तव्यांचा, जागर संविधानाचा...! जागर अधिकार आणि कर्तव्यांचा, जागर संविधानाचा...!

मुख्य संदेश:

"संविधानाचा जागर, राष्ट्रासाठी योगदान! चला, आपल्या भारताच्या उज्वल भविष्यासाठी पुढे येऊया! देशाचा उत्सव साजरा करूया..!”

अभियानाची माहिती

संविधानिक शिक्षण

लोकशाहीची मूळ तत्त्वे, अधिकार, आणि कर्तव्ये लोकांपर्यंत पोहोचवणे.

राष्ट्रीय सणांचे महत्त्व:

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दिवस केवळ सुट्टी नव्हे तर देशभक्तीचा महोत्सव म्हणून साजरे करणे.

वंचित घटकांपर्यंत पोहोचणे:

ग्रामीण आणि निमशहरी भागातील गृहिणी, कामगार तसेच वडीलधारी मंडळी ज्यांना झेंडावंदनाची संधी मिळत नाही, अश्या नागरिकांना जागृत करून त्यांना देशाच्या महोत्सवात सहभागी करून घेणे. त्या नागरिकांमध्ये एकात्मता आणि एकतेचा प्रसार करणे.

तरुणांमध्ये नेतृत्त्व जागरूकता:

युवा वर्गाला जबाबदारीची भावना निर्माण करून सामाजिक परिवर्तनात सहभागी करून घेणे.

अभियानाची मुख्य वैशिष्ट्ये

जागरूकता सत्रे
(१६-२5 जानेवारी):

संविधानाचे शिक्षण:
आपल्या अधिकारांचे संरक्षण आणि कर्तव्यांचे पालन याविषयी मार्गदर्शन.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश (१६-२5 जानेवारी):

विविध धर्म, भाषा, आणि संस्कृतींच्या प्रतिनिधींचा सहभाग वाढवणे.

कार्यशाळा आणि चर्चासत्रे: (१६-२5 जानेवारी):

शाळा, महाविद्यालये, आणि स्थानिक समुदायांमध्ये अभियानाची माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करणे.

सामूहिक राष्ट्रगीत गायन
(२६ जानेवारी):

२६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता, सर्वांनी एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी सामूहिक “झेंडावंदन व राष्ट्रगीत” गायनाचे आयोजन करणे.

अभियानाचा कालावधी:

• सुरुवात: १६ जानेवारी २०२५
• समाप्ती: २6 जानेवारी २०२५

स्पर्धा आणि सहभागी होण्याचे नियम

01

तुमच्या गाव, शहर, किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकशाहीची मूळ तत्त्वे, अधिकार, आणि कर्तव्ये याबद्दल संविधान जागरूकता कार्यक्रम आयोजित करा.

02

२६ जानेवारीला सामूहिक झेंडावंदन व राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करा.

03

कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ, आणि अहवाल आमच्याकडे पाठवा.

पुरस्कार

01

प्रथम पारितोषिक

₹21,000

02

द्वितीय पारितोषिक

₹14,000

03

तृतीय पारितोषिक

₹7,000

प्रत्येक सहभागी संघाला विशेष प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू:

स्पर्धेत सहभागी होण्याची प्रक्रिया:

01

नोंदणी

दिलेला Google Form भरून नोंदणी करा.

02

कार्यक्रम आयोजित करा

संविधान जागरूकता सत्रे - परिसरातील शाळा, महाविद्यालये, चौपाटी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी लोकांना माहिती द्या. (सोबत दिलेली माहिती तुमच्या शब्दात लोकांना सांगा.)

03

२६ जानेवारीला सामूहिक राष्ट्रगीत गायन.

२६ जानेवारीला लोकांनि आपल्या गावात, मोहल्ल्यात, सोसायटीमध्ये, संस्थांमध्ये सार्वजनिक राष्ट्रगीत व झेंडावंदनाचे कार्यक्रम आयोजित करावे, यासाठी त्यांना प्रोत्साहित करून त्यांना या मोहिमेत सहभागी करून घ्या. जे इच्छुक असतील त्यांचा संपर्क घेऊन त्यांना २६ जानेवारीच्या कार्यक्रमबद्दल मार्गदर्शन करा. o फोटो, व्हिडिओ, आणि अहवाल स्वतःच्या Gmail वर एका Google Drive फोल्डर मध्ये Save करा. (त्या Folder चा View Access 'ekvadalbharatach@gmail.com' या ई-मेल वर द्या.) · तसेच आपल्या उपक्रमाची माहिती दररोज सोशल मीडिया वर टाकून लोकांना जागृत करा. सर्व फोटो व रिल्स WhatsApp, Facebook, Instagram, X - Story & पोस्ट च्या माध्यमातून शेयर करा.

Let's Create History Together

एक वादळ भारताच: युवा नेतृत्त्व अभियान – २०२५ 

Want to be a Leadership Ambassador